हुक्का पार्लरवाल्या हॉटेलचे परवाने रद्द करू: देवेंद्र फडणवीस File Photo
पुणे

हुक्का पार्लरवाल्या हॉटेलचे परवाने रद्द करू: देवेंद्र फडणवीस

'कोणी हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येतील'

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे शहरात अनेक ठिकाणी विशेषतः महाविद्यालय परिसरात हुक्का पार्लर हॉटेलमध्ये बेकायदेशीर चालवली जातात. त्या ठिकाणी हुक्काच्या नावाखाली ड्रग, गांजा तसेच अमली पदार्थ मुलांना दिले जातात. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी हे प्रकार सुरू असून, अशा हुक्का पार्लरला कोरेगाव पार्क तसेच परिसरात परवानगी दिली आहे का? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी 2018 मध्ये कायदा करण्यात आला. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास तीन वर्षे शिक्षा आहे. मात्र, आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून, दुसर्‍यांदा हुक्का सापडल्यास सहा महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे आणि तिसर्‍यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT