पुणे

पुणे : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गिरीश बापट यांची भेट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये भाजपचे खासदार गिरीश बापट यांना भेटण्यासाठी आज सायंकाळी साडेसहा वाजता घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे पोहोचले आहे. श्री बापट गेले काही दिवस आजारी आहेत. त्यांना आठवड्यातून दोन दिवस डायलीसिस करावे लागत असल्यामुळे ते कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचारात थेट सहभागी झालेले नाही.

मी आजारी असल्यामुळे प्रचार करणार नसल्याचे बापट यांनी काल जाहीर केले. कसबा पेठ मतदारसंघातून बापट 1995 पासून सलग पाच वेळा निवडून आले ते 2019 पर्यंत आमदार होते. शेवटच्या पाच वर्षात ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते 2019 मध्ये पुण्यातून खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागी माजी महापौर मुक्ता टिळक यांना 2019 मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे सध्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याचा प्रचार जोरात सुरू आहे. मात्र बापट यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्टपणे जाहीर केलेली नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधक ही आक्रमकपणे प्रचाराला लागले आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस हे आज बापट यांच्या भेटीस आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाशिवरात्री ला शनिवारी बापट यांना भेटण्यासाठी येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT