पुणे

महंमदवाडी, मुंढवा परिसरात रस्त्यांचा पीपीपीतून विकास

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महंमदवाडी, रामटेकडी आणि मुंढवा परिसरातील 164 कोटींचे सहा रस्ते पीपीपी धर्तीवर क्रेडिट नोटच्या माध्यमातून विकसित करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमून त्यानंतर या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात खासगी सहभागातून (पीपीपी) क्रेडिट नोटच्या माध्यमातून विकास आराखड्या तील रस्ते आणि पूल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चालू वर्षात खराडी, मुंढवा परिसरातील तसेच नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत बंडगार्डन ते मुंढवा अशी एकूण 1 हजार 38 कोटींची कामे प्रस्तावित आहेत.

आता त्यात नव्याने सहा रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्याचा निर्णय आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे. या कामांसाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत या रस्त्यांच्या कामांसाठी पाठपुरावा केला होता.

हे रस्ते होणार विकसित…
महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेटपर्यंत स. नं. 40 ते स. नं. 76 मधून जाणारा 30 मीटरचा डीपी रस्ता व लगतचा 18 मीटरचा डीपी रस्ता. यासाठी 72 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

  • महंमदवाडी स. नं. 1, 2, 3, 4 व 57, 58, 59, 96 मधून जाणारा 24 मीटर डीपी रस्ता. यासाठी 31 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
  • महंमदवाडी स. नं. 12, 13, 30, 32 व 57 मधून जाणारा 18 मीटर डीपी रस्ता. यासाठी 16 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
  • मुंढवा रेल्वे स्टेशन परिसरातील स. नं. 64, 66, 67, 68, 71 मधील 12 मीटर व 24 मीटर डीपी रस्ता. खर्च 46 कोटी अपेक्षित.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT