आंबेगावच्या पूर्व भागात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी File Photo
पुणे

आंबेगावच्या पूर्व भागात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

अनेक गावांमध्ये जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

यावर्षी पावसाळ्यात शेवटी कमी प्रमाणात पाऊस झाला. परतीचा पाऊस न झाल्याने पूर्व भागातील गावांमधील विहिरींनी तळ गाठला असून, विविध ठिकाणचे पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत, अशी माहिती वडगावपीर येथील शेतकरी योगेश आदक पाटील यांनी दिली.

गावातील जलस्रोत आटल्याने शेतीपिकांना पाणी देणे मुश्कील बनले आहे. तसेच, पाणी नसल्याने शेतात जनावरांसाठी असणारा चारा सुकून चालला आहे. त्यामुळे जनावरांना सांभाळण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे.

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात या भागात पाण्याची टंचाई असते. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची कमतरता भासू लागल्याने पुढील दोन-तीन महिने कसे जाणार, याची काळजी शेतकर्‍यांना पडली आहे. या भागातील दृष्काळसदृश परिस्थितीचा आढावा प्रशासनाने तातडीने घ्यावा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी वडगावपीर, धामणी, शिरदाळे येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT