पुणे

आंब्याचा हंगाम संपल्याने अन्य फळांना मागणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनच्या आगमनानंतर कर्नाटकातील आंब्याचाही हंगाम संपल्याने बाजारात अन्य सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. बाजारातील मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगडाच्या भावात किलोमागे पाच रुपये, पपई एक ते दोन रुपये तर सीताफळ व डाळिंबाचे भाव दहा टक्क्यांनी वधारले आहेत. पावसास सुरवात झाल्यानंतर लिंबाच्या मागणीत घट होऊन दरातही घसरण होईल या अपेक्षेने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात अपरिपक्व लिंबाची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने लिंबाचे दर 15 किलोंच्या गोणीमागे 50 रुपयांनी उतरले आहेत.

किरकोळ बाजारात दहा रुपयांना दहा लिंबाची विक्री करण्यात येत आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर आहेत. मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 5 ट्रक, मोसंबी 30 ते 40 टन, डाळिंब 35 ते 40 टन, पपई 7 ते 8 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड 2 ते 3 टेम्पो, खरबूज 1 ते 2 टेम्पो, पेरू 700 ते 800 क्रेट्स, चिकू250 डाग इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 50-200, मोसंबी : (3 डझन) : 200-450, (4 डझन) : 100-250, संत्रा : (10 किलो) : 200-1000, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 60-200, गणेश : 10-30, आरक्ता 30-100, कलिंगड : 15-30, खरबूज : 20-35, पपई : 15-22, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिकू (दहा किलो) : 100-50

हेही वाचा

SCROLL FOR NEXT