पुणे

देहूत आज उपनगराध्यक्षपदाची निवडणूक

अमृता चौगुले

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा :  देहू नगरपंचायतीचे रिक्त झालेले उपाध्यक्ष पद आणि नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदांची निवडणूक व निवडणूक कार्यक्रम जाहीर करीत देहूतील सभागृहात विशेष सभा घेऊन शुक्रवारी (दि.29) घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा रसिका काळोखे यांनी उपाध्यक्ष पदाचा तर स्वीकृत नगरसेवक आनंदा काळोखे आणि रोहित काळोखे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक घेण्याचे आदेश नुकतेच उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेली उपविभागीय अधिकारी असणार आहेत. असा आहे निवडणूक कार्यक्रम-शुक्रवार ( दि. 2 ) स. 10 ते दु.12 पर्यंत. उपाध्यक्ष आणि नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत) पदासाठी नामनिर्देशित अर्ज मुख्याधिकारी सादर करणे. दु. 12 वाजेपासून पिठासीन अधिकारी यांनी अर्जाची छाननी करणे. छाननीनंतर 15 मिनिटे माघारी घेण्यासाठी त्यानंतर लगेचच निवड जाहीर . उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर झाल्यानंतर दुपारी 1 वाजेनंतर नामनिर्देशित सदस्य जाहीर करणे.

SCROLL FOR NEXT