पुणे

लोणी-धामणी : बिबट्याचा मृत बछडा आढळला

अमृता चौगुले

लोणी-धामणी (ता. आंबेगाव ) : तालुक्यातील जारकरवाडी गावाच्या हद्दीत सहा महिने वयाच्या बिबट्याचे पिलू मृतावस्थेत आढळले. प्रगतशील शेतकरी विशाल चंद्रकांत कापडी यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. जारकरवाडी परिसरात डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची चारी आहे.

या चारीत बुधवारी (दि. 21) सकाळी बिबट्याचे पिलू विशाल कापडी व ग्रामस्थांना मृतावस्थेत दिसून आले. वनपाल साईमाला गिते यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. या परिसरात कोल्हा, लांडगे, मोर, ससे आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्यादेखील जास्त आहे.

SCROLL FOR NEXT