पुणे

देहुगाव : इंद्रायणी नदीत पुन्हा आढळले मृत मासे

अमृता चौगुले

देहुगाव (पुणे) : देहुगावच्या इंद्रायणी नदीत पुन्हा मासे मृत्युमुखी पडलेले आढळून आले आहेत. पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्यामुळे सूर्यकिरण माशांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच, माशांचे मुख्य खाद्य पाण्यातील शेवाळ आहे. जलपर्णीमुळे मासे शेवाळ खाऊ शकत नाहीत. त्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. नदीतील पाण्याचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्या वेळी पाणीही गढूळ होते. त्याचा आहवाल आला आहे. रासायनिक पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे मासे कशामुळे मृत झालेत याचे कारण शोधवे लागेल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले. मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले, की देहूनगर पंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली आहे. उर्वरित जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येत आहे. देहूच्या इंद्रायणी नदीत जे ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. असे सर्व स्रोत बंद करण्याचे काम सुरू आहे.

SCROLL FOR NEXT