Pune Crime news पुणे : पुण्यातील कोंढव्यात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना समोर आली आहे. परिसरातील शालिनी कॉटेज साळुंके विहार रोड येथील राहत्या घराच्या काचेवर गोळीबार झाल्याचे समोर येत आहे. श्रीकांत कानडे यांच्या घरावर गोळीबार झाला आहे.
सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नसल्याचे समोर येत आहे. गोळीबार झाला त्यावेळी घरात तीन लोक होते. बिलाल जुल्फीकार शेख (वय 29) याने एअर रायफलमधून 5 राऊंड फायर केल्याचे समोर येत आहे.
या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.