पुणे

दौंडचा तुषार दुबे ’मुळशी केसरी’चा मानकरी

अमृता चौगुले

पौड(मुळशी ); पुढारी वृत्तसेवा : मुळशी केसरी किताबसाठी झालेल्या लढतीत दौंडच्या तुषार दुबेने अंतिम फेरीत मुळशीच्या आकाश रानवडे याचा 10-0 असा तांत्रिक गुणाधिक्क्याने पराभव केला. तुषार याला रोख 31 हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. उपविजेत्या आकाशला रोख 21 हजार व चषक देण्यात आला. घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे मुळशी केसरी प्रतिष्ठानाच्या वतीने मुळशी किताब अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत एकूण 225 मल्ल सहभागी झाले होते.

प्रतिष्ठानाचे संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष राजेंद्र बांदल, कार्याध्यक्ष बाळासाहेब आमले, सचिव शरद पवार, खजिनदार सचिन मोहोळ आणि प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते. स्पर्धेत हिंद केसरी अभिजित कटके व महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा सत्कार करण्यात आला. धनंजय दाभाडे यांच्या स्मरणार्थ युवा नेते मधुर दाभाडे यांनी विजेत्याला मानाची चांदीची गदा दिली.

अमृता केसरी किताबाची कुस्ती हवेलीचा शुभम थोरात आणि इंदापूरचा अनिल कचरे यांच्यात झाली. दुसर्‍या फेरीत शुभमने अनिलला चितपट केले. त्याला रोख 25 हजार रुपये, चषकर; तर अनिलला रोख 15 हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेला आ.संग्राम थोपटे, चंद्रकांत मोकाटे, शरद ढमाले, राजा हगवणे, शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, बाळासाहेब चांदेरे, महादेव कोंढरे आदी मान्यवरांसह कुस्तीशौकीन उपस्थित होते.

गटनिहाय चार क्रमांक :
1) 45 किलो : ऋग्वेद मोरे पिरंगुट, ओंकार गायकवाड भुकूम, आरुष चव्हाण कोंढावळे, मल्हार लेने कासारसाई.
2) 55 किलो : दिनेश मालपोटे कातरखडक, अथर्व गोळे पिरंगुट, साहिल देशमुख भूगाव, अनिकेत खेडकर लवळे.
3) 57 किलो : स्वप्नील शेलार बारामती, विशाल थोरवे खेड, राहुल कुंभारकर सासवड, अमित कुलाळ शिरूर.
4) 61 किलो : अमोल बालगुडे वेल्हा, अभिषेक हिंगे मावळ, अजय मोहिते खेड, मिलिंद हरणावळ इंदापूर
5)65 किलो : योगेश तापकीर पिंपरी चिंचवड, वैष्णव आडकर मावळ, सचिन दाताळ हवेली, अभिषेक जाधव मुळशी
6) 70 किलो : सूरज कोकाटे इंदापूर, आबा शेंडगे शिरूर, चंद्रकांत आडेवाड हडपसर, सनी केदारी मावळ 7) 74 किलो : शुभम थोरात हवेली, अनिल कचरे इंदापूर, अरुण खेंगले खेड, शिवाजी टकले बारामती.
8) खुला गट : तुषार दुबे दौंड, आकाश रानवडे मुळशी, मामा तरंगे इंदापूर, आदित्य मोहोळ मुळशी.

SCROLL FOR NEXT