पुणे

दौंड रेल्वे स्थानक १ एप्रिल पासून पुणे विभागात

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या १ एप्रिल पासून दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले जाईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. गेले अनेक वर्षे यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता, त्याला यश लाभल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे जिल्ह्यातील दौंड रेल्वेस्थानक हे यापूर्वी सोलापूर विभागात येत होते. ते पुणे विभागात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. आज अखेर रेल्वे मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की "हि अतिशय आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून येत्या १ एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरु होता. यास यश आले असून, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार व्यक्त करते. दौंड येथून प्रवास करणाऱ्या  प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे गैरसोयीचे आहे. हे वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले होते. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित केला होता. दौंडहून पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे अखेर रेल्वे मंत्रालयास पटले. दौंड तालुक्यातील मधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकही बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यास प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो.  या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले असून आता यापुढे अडीअडचणींंसाठी सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही." असेही त्या म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT