दापोडी : पुढारी वृत्तसेवा : सध्या लग्नसराई जोमात सुरू आहे. त्यामुळे शोभिवंत फुलांना मागणी वाढली आहे. शोभिवंत फुला व्यतिरिक्त इतर फुलांची आवक आणि मागणी समप्रमाणात असल्याने भाव स्थिर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा फुलांच्या प्रतवारीवर मोठा परिणाम होत आहे.
दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात अनेक फुल विक्रीची दुकाने आहेत. होलसेल दरात आणलेली फुले तसेच हार, माळा टिकविणे मोठे जिकिरीचे काम बनले आहे.
मागणी असेल आवक कमी आणी जावक असेल तर आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वीजेचा लपंडाव सुरु असतो. कोरोना परिस्थिती अटोक्यात आली असली तरी व्यवसाय करणे कठीण बनले आहे.
झेंडू 20 ते 50, गुलछडी 100 ते 250, अँस्टर जुडी 50 ते 70, सुट्टा 200 ते 300, बिजली 60 ते 150, कापरी 20 ते 60, शेवंती 150 ते 250 गडीचे भाव, गुलाब गड्डी 25 ते 50, गुलछडी काडी 100ते200, डच गुलाब 20नग 80ते200, जर्बेरा 60ते100, कार्नेशियन 200 ते 300, शेवंती काडी 200 ते 300, लिलीयम 10 काड्या 1400 ते 1600, आर्चिड 500ते 600, ग्लँडिओ 10 काड्या 80 ते 150.
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे फुलं विक्रीचा व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्राहक सुकलेली फुलांचा हार विकत घेत नाहीत.अर्ध्या किमतीला फुलांची ग्राहक मागणी करतात. तसेच ग्राहकांना ताजीतवानी फुले लागतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये फुले टिकविणे मोठे अवघड काम बनले आहे.
– एक फुल विक्रेते, दापोडी.