पुणे

Danny Pandit: अथर्वच्या इन्फ्लुएन्सर मित्राचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, गणेशोत्सवातील 'सर्वधर्म समभाव' दाखवणारा व्हिडिओ पहा

इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित याने व्हिडिओ पोस्ट करत दिला अथर्व सुदामेला पाठिंबा

Namdev Gharal

Danny Pandit | Atharva’s Influencer Friend Gives Befitting Reply to Trolls with Ganeshotsav Unity Video

पुणे : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे गणेशोत्सवातील हिंदू- मुस्लीम सलोख्यावर भाष्य करणाऱ्या व्हिडिओमुळे हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आला. हा व्हिडिओ डिलिट करत सुदामेने माफी मागितली असली तरी आता त्याचा मित्र आणि इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितनेही एक व्हिडिओ पोस्ट करत अथर्व सुदामेला पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहे डॅनीच्या व्हिडीओमध्ये?

डॅनी पंडीत या नावाच्या पेजवरुन शेअर केलेल्‍या या व्हिडीओमध्ये गणपती बाप्पांची आरती सुरु आहे. यामध्ये सर्वजण अगदी भक्‍तीभावाने आरती करत असतात. यामध्ये एक लहानगीही उपस्‍थित असते. दरम्‍यान अचानक एक मुस्‍लिम महिला दरवाजात येते व त्‍या लहानगीला ‘झोया’ अशी हाक मारते व बोलावून घेऊन जाते. यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावरले भाव बदलतात. पण लगेचच झोया एक ताट घेऊन येते. त्‍यामध्ये मोदक असतात हे पाहून आरतीला उपस्‍थित सर्वचजण अवाक होतात. मोदक पाहून झोयाला विचारता हे कुणी बनवले तर ती उत्तर देते ‘अम्‍मीने’ याचवेळी मुस्‍लिम महिला आत येते व सर्वजण मोदकाचा आस्‍वाद घेतात. याचवेळी पार्श्वभूमीला ‘यारे या या सारे या गजाननाला आळवूया’ हे गाणे वाजते. या व्हिडीओतून देवाला कोणत्‍याही धर्माचे वावडे नाही दे दाखवण्याचा प्रयत्‍न केला आहे.

विशेष म्हणजे व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही अनेकांनी डॅनी पंडितचं समर्थन केले आहे. सारंग साठे, दिशा काटकर यांनी व्हिडिओचं कौतुक केले आहे. तर अनीस मुल्ला या युजरने कमेंट केलीये की, मी मुस्लीम असून हा व्हिडिओ मला भावला आहे. श्रद्धेचे मार्ग वेगवेगळे असू शकतात पण प्रेम, आदर यामुळेच सर्व जण एकत्र येतात. गणपती बाप्पाचा सर्वांना आशीर्वाद आहे.

अथर्व सुदामेचा वाद काय होता?

अर्थव सुदामे याने पोस्‍ट केलेल्‍या व्हिडीओमुळे.हिंदू समाजाच्या भावना दुखावल्‍या गेल्‍या आहेत असा आरोप करण्यात आला होता. ‘तुम्‍ही फक्‍त रिल्‍स’ बनवा धर्माच्या बाबतीत नाक खूपसू नका असेही सुदामे यांना सुनावण्यात आले होते. विशेषत ब्राम्‍हण महासंघाने सुदामेवर तिखट टीका करत, तो व्हिडिओ हटवण्यास अथर्वला भाग पाडले.या वादामुळे अथर्वला सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्या, ज्यामुळे त्यांनी सार्वजनिक माफी मागितली आणि व्हिडिओ हटवला.

व्हिडीओत काय होते ?

गणेश चतूर्थीपूर्वी अर्थव सुदामे एका ठिकाणी मूर्ती घेण्यास जातो. ते दुकान एका मुस्‍लिम धर्मियाचे होते, तो दुकानदार तुम्‍हाला काही अडचण असेल तर तुम्‍ही दुसऱ्या दुकानातून मूर्ती घ्‍या असे सुचवतो. पण सुदामे म्‍हणतो की आपण ‘साखर’ व्हावे जी खीर करण्यासही वापरता येते व शिरखूर्म्यालाही वापरला येते. गणेशोत्सवानिमित्त हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा ही रील व्हायरल झाली होती.

यावर अनेकजणांनी सुदामेंना ट्राेल केले हाेते तर सुदामेंच्या समर्थनातही काहीजण उतरले होते. वकील असिम सरोदे यांनीही अथर्वचे समर्थन केले आणि व्हिडिओ हटवणे चुकीचे असल्याचे व्यक्त केले. त्यांनी शिवसेना प्रमुख राज ठाकरे यांच्याशी अथर्वच्या बाजूने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती देखील समोर आली. दरम्‍यान आज डॅनी पंडीत याने शेअर केलेल्‍या या व्हिडीओमध्ये सुदामेचे समर्थन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT