Arnab Cyclon 2026 Maharashtra Todays Updates
पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब हे चक्रीवादळ आज रात्री महाचक्री वादळात परिवर्तित होत आहे. बुधवारी सकाळी ते विशाखापट्टणम येथील जमिनीवर धडकणार आहे. तिथून पुढे त्याचा प्रवास आंध्र प्रदेश मार्गे मराठवाडा आणि विदर्भातून जाणार असल्याने महाराष्ट्रात मोठ्या पावसाचे संकेत आहेत. राज्यात 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार ३० ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढू शकते. मात्र, पावसाचे वितरण सर्व जिल्ह्यांत सारखे नसेल.३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होईल. त्यानंतर नाशिक आणि आसपासच्या परिसरांत पावसाची शक्यता आहे. तसेच, दक्षिण गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतही स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
संभाव्य प्रभावित क्षेत्रे:
नाशिक
धुळे
नंदुरबार
जळगाव
पालघरचे काही भाग
अहिल्यानगर परिसरातील भाग
१ ते ३ नोव्हेंबर दरम्यान ची स्थिती...
हे महाचक्रीवादळ विशाखापट्टणम येथे बुधवारी 28 रोजी धडकेल तिथून हैदराबाद मार्गे 29 रोजी मराठवाडा आणि विदर्भातून जाईल. त्यामुळे महाराष्ट्रात 29- 30 ऑक्टोबर आणि त्यापुढे 1ते 3 नोव्हेंबर असा पाच दिवस राहणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रातून 29 रोजी रात्रीच मध्यप्रदेशात धडकणार असले तरी महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस त्याचा प्रभाव राहणार आहे
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगरच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. स्थानिक परिस्थितीमुळे, पश्चिम घाटाच्या आसपासच्या काही भागांत पावसाचा जोर अधिक असू शकतो.
विदर्भ
नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसह विदर्भाच्या अनेक भागांत पावसाची शक्यता वाढली आहे.पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागांत तुलनेने अधिक पाऊस पडू शकतो.
कोकण आणि मुंबई विभाग
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत स्थानिक हवामान परिस्थितीमुळे अधूनमधून पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागांत पावसाची तीव्रता आणि वेळ अद्याप निश्चित नाही.
पावसाच्या संभाव्य तारखा...
३०-३१ ऑक्टोबर : नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भाग
१-३ नोव्हेंबर: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
1-3नोव्हेंबर: विदर्भ: नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक भागांत पावसाचे संकेत.
कोकण: काही ठिकाणी अधूनमधून पावसाची शक्यता.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
काढणीसाठी तयार असलेली पिके, शेतमाल आणि उघड्यावर ठेवलेला शेतीमाल हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठेवा. मेघगर्जना होत असताना मोकळ्या शेतात काम करणे टाळा.