Cyclone Akvan | ‘अक्वा‍न’मुळे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस File Photo
पुणे

Cyclone Akvan | ‘अक्वा‍न’मुळे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस

पुढारी वृत्तसेवा

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘अक्वा‍न’ चक्रीवादळ शुक्रवारी (दि. २०) दुपारी उत्तर आंध्र ते दक्षिण ओडिशाच्या नरसापूर ते पुरी किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यासाठी दोन्ही राज्य सरकारची यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

‘अक्वा‍न’ चक्रीवादळ गुरुवारी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात ताशी १७ कि.मी. वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, शुक्रवारी दुपारी ते आंध्र ते ओडिशादरम्यानच्या गोपाळपूर किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वार्‍यांचा वेग ताशी ११० कि.मी.पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

ओडीशात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीच्या भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळत असून, वेगवान वार्‍यांसह समुद्रदेखील खवळलेला आहे. यामुळे किनारपट्टीच्या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, येथील रेल्वे आणि विमानसेवादेखील बाधित झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साठले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT