पुणे

कटरने गळा चिरून तरुणाची आत्महत्या; धायरीतील घटना

अमृता चौगुले

पुणे / धायरी; पुढारी वृत्तसेवा: धायरीतील रायकरमळा परिसरातील एका तरुणाने राहत्या घरात स्वतःच्या गळ्यावर धारदार कटरने वार करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. महेश राजाराम तवंडे (वय 32, रायकर मळा, धायरी, मूळ कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे समजू शकले नसले, तरी त्याला एका तरुणीसोबत लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या घरचे त्याला विरोध करीत होते. त्यातूनच तो नैराश्यात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा खासगी कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून नोकरी करीत होता. त्याच्या मैत्रिणीसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. त्याची मैत्रिण बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेते. तीदेखील कोल्हापूरची आहे. काही दिवसांपूर्वी ती गावी गेली होती. त्यामुळे महेश हा एकटाच फ्लॅटवर राहात होता. तो मानसिक तणावात होता.

दिवसा तो कुणाशी तरी मोठ्याने फोनवर बोलत होता. संशय आल्याने रात्री घरमालकाने दरवाजा ठोठावला असता आतमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT