पुणे

सीयूईटी परीक्षा ऑफलाइन-ऑनलाइन; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना होणार फायदा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने 2024 च्या सीयूईटी परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदापासून कॉमन युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा हायब्रिड पद्धतीने घेतली जाणार आहे. म्हणजेच, परीक्षा पेन-पेपर मोड/ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने घेतली जाईल. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार त्यांना कोणत्या मोडमध्ये परीक्षा द्यायची आहे ते निवडू शकतात. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. असे झाल्यास ते फक्त त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसू शकतील.

वास्तविक, ग्रामीण भागात ऑनलाइन परीक्षेची सुरळीत व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्यांना दुसर्‍या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. सीयूईटी परीक्षा 2024 साठी नोंदणी कधी सुरू होईल, याची अचूक तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु, 19 फेब्रुवारीपासून संबंधित परीक्षेसाठी नोंदणी सुरू होऊ शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते र्लीशीं. cuet. samarth.ac.in ही लिंक चालू झाल्यानंतर अर्ज करू शकतात. परीक्षा 15 ते 31 मे 2024 दरम्यान घेतली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT