पुणे

पुणे : पदवी-पदव्युत्तर प्रवेशाची सीयूईटी परीक्षा मे महिन्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य विद्यापीठांमध्ये पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक विद्यापीठीय प्रवेश परीक्षा अर्थात 'सीयूईटी' येत्या मे महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. रजनीश जैन यांनी सांगितले आहे.

विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिलेल्या निर्देशानुसार, 'सीयूईटी' परीक्षा 21 ते 31 मे दरम्यान घेण्यात येणार आहे. देशपातळीवरील या एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संलग्न विद्यापीठांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षापासून केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी 'सीयूईटी' ही परीक्षा घेतली जाते.

सीयूईटी पीजीच्या वेळापत्रकानुसार जून 2023 च्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात सीयूईटी पीजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत होणार असून, देशात साधारण 1 हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी साधारण 450 ते 500 परीक्षा केंद्रांचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूचा पर्याय देण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून…
'सीयूईटी'यूजी परीक्षेचा निकाल जूनच्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर होईल, तर 'सीयूईटी'पीजी परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानुसार विद्यापीठांनी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यातच पूर्ण करावी. 1 ऑगस्ट 2023 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT