पुणे

घोड नदीवर मासेमारीसाठी गर्दी; कळंब येथील चित्र

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा: घोड नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आल्यामुळे कळंब (ता. आंबेगाव) येथील घोड नदीपात्र फुलून गेले आहे. नदीवर मासेमारी करण्यासाठी आदिवासी समाजातील ठाकर, फासेपारधी तरुणांनी गर्दी केली आहे. आदिवासी समाजातील ठाकर, फासेपारधी तरुण नदीपात्रातील पाण्यातून मासे पकडून त्या मिळणार्‍या पैशातून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे मासेमारी करणारे तरुण जागोजागी बसून मासे पकडण्यासाठी धडपड करीत आहेत.

कळंबपासून चांडोलीपर्यंत ठिकठिकाणी मासेमारी करणार्‍या तरुणांनी जाळी, गळमार्फत मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे. घोड नदीत मरळ, शिंगटा, पोपट, वाम, खवल्या अशा प्रकारचे मासे मिळत आहेत. काही तरुणांनी ओढ्यामध्ये पिंजरे मांडून खेकडे पकडण्यासाठी सुरुवात केली आहे. बरेचसे तरुण सकाळपासून सायंकाळपर्यंत मासेमारी करण्यासाठी एकाच जागेवर स्थिर बसून असतात. बहुतांश वेळा दिवसभर बसूनसुद्धा गळाला मासेसुद्धा लागत नाहीत, अशीसुद्धा परिस्थिती काही वेळा येत असते, असे मासेमारी करणार्‍या तरुणांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT