श्रीनाथ म्हस्कोबा Pudhari
पुणे

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

भाद्रपद अमावास्येनिमित्त बुधवारी (दि. 2) श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांकडून होत असलेल्या ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी 6 वाजता गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच कोडीत देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने देवास दही, दूध, पंचामृत अभिषेक करण्यात आला. 10 वाजता देवाला भाविक व ग्रामस्थांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. पुजारी व ग्रामस्थांनी देव घेत पारंपरिक वाद्यांसह मंदिर प्रदक्षिणा केली. या वेळी गुलालाची उधळण व ढोल-ताशांचा गजर करीत ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा गजर करण्यात आला. नैवेद्य घेऊन मंदिर प्रदक्षिणा झाली.

दुपारी 12 वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सव्वाएक वाजता गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. समस्त तुळजीबुवा मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ट्रस्टच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शनबारी, वाहनतळाची सुविधा देण्यात आली होती.

श्रीनाथ म्हसोबा महाराज ट्रस्टचे बाळासाहेब आश्रु बडदे, बाळासाहेब यशवंत बडदे, ईश्वर बडदे, सुदाम बडदे, सागर बडदे, रमेश जरांडे, सूरज जाधव, मोहन तळेकर, निवृत्ती बडदे, सचिन बडदे, संतोष बडदे, अनिल बडदे, तानाजी बडदे, गणेश बडदे, नरेंद्र बडदे, आप्पा बडदे, शेखर बडदे, योगेश खुटवड आदी या वेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT