पुणे

पिंपरी : पावसाने विश्रांती दिल्याने भाजी मंडईत गर्दी

अमृता चौगुले

पिंपरी : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला पाउस सोमवारी काहीसा कमी झाल्याने पिंपरी मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. पिंपरी कॅम्प, पिंपरी बाजार पेठ, शगुन चौकात सतत असणारी वर्दळ पावसामुळे मंदावलेली दिसत होती. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याचे दिसून आले होते.

सोमवारी काही प्रमाणात पाउस कमी झाला होता. त्यामुळे संत तुकारामनगर, अजमेरा, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, वल्लभनगर आदी परिसरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी दिसून आली. आठवड्याची भाजी खरेदी करण्यासाठी पिंपरी येथील मंडईतही नागरिकांनी गर्दी झाल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT