पुणे

गुन्हेगारांची फ्लेक्सबाजी ! राजकीय पदाधिकार्‍यांचे फोटो असल्याने पोलिसांचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

पिंपरी : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण डोके वर काढू लागले आहेत. नुकतेच डांगे चौक येथे एका तडीपार गुंडाने दहीहंडी उत्सवाचा लावलेला 'फ्लेक्स' चर्चेचा विषय ठरला. फ्लेक्सवर राजकीय पदाधिकार्‍यांचे फोटो असल्याने पोलिसांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांचेदेखील हात बांधले गेले आहेत. मात्र, अशा प्रकारे गुन्हेगारांचे फोटो झळकू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अलीकडे काही राजकीय पदाधिकारी गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करून लागले आहेत. नेत्याचा फोटो सोबत लावून गुन्हेगार परिसरात दहशत पसरवू लागले आहेत. याकडे पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

राजकीय पोशिंदे शोधण्याची गरज
व्यासपीठावरून मोठी भाषणे देणारी नेतेमंडळी प्रत्यक्षात मात्र अल्पवयीन गुन्हेगारांचे पोशिंदे ठरत आहेत. एकीकडे शहरातील वाढत्या
गुन्हेगारीवर मोठी भाषणे देणार्‍या नेत्याने एका गुन्हेगाराचा आपल्या पक्षात जाहीर प्रवेश करून घेतला होता; मात्र माध्यमांनी राळ उठवल्यानंतर संबंधित गुन्हेगाराची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. एका गुन्हेगाराची हकालपट्टी करून मूळ समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांचे राजकीय पोशिंदे शोधून त्यांना कायदेशीर चाप लावण्याची गरज आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT