पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अॅटोरिक्षा संघटनांनी सोमवारी पुणे आरटीओ कार्यालयासमोर बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन केल्यामुळे संघटनांच्या अध्यक्षासह पिंपरी-चिंचवडमधील काही रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी काही रिक्षाचालकांनी रस्त्यावरून धावणार्या रिक्षा अडविल्या आणि संपाबाबत माहिती देऊन रिक्षांचे फोटो काढून त्यांना धमकाविण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
मात्र, शहरातील बघतोय रिक्षावाला संघटना तसेच आरपीआय रिक्षा वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख हे माहिती देताना म्हणाले, की 'आम्ही रिक्षा वाहतूक सुरू ठेवली होती; परंतु पोलिसांनी रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केल्याने आम्ही पुन्हा राज्यात आंदोलन उभारणार आहोत.'