Corporate Jihad | नाशिकनंतर पुण्याच्या आयटी कंपनीत ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’ 
पुणे

Corporate Jihad | नाशिकनंतर पुण्याच्या आयटी कंपनीत ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नाशिक येथील ‌‘टीसीएस‌’ आणि मुंबईतील ‌‘एसबीआय‌’नंतर आता पुण्यातील ‌नामांकित आयटी कंपनीत ‌‘कॉर्पोरेट जिहाद‌’ आणि धार्मिक छळाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करण्यास आणि एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने एका हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पीडित महिलेने सांगितले, की कंपनीतील सहकाऱ्याने तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मानसिक दबाव निर्माण केला होता. या छळाबाबत कंपनी प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई करण्याऐवजी उलट मलाच बळजबरीने राजीनामा देण्यास भाग पाडून कामावरून काढून टाकले.

याबाबत घनवट यांनी सांगितले की, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. याप्रकरणी पीडित महिलेने विप्रो प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावून 50 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील ही घटना अत्यंत चिंताजनक असून, यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नागपुरात महिलेचे धर्मांतरण; सहा जणांवर गुन्हा

नागपूर : जीवानिशी मारण्याची धमकी देत कोलकात्यातील एका महिलेचे बळजबरीने धर्मांतरण केल्याप्रकरणी जिल्ह्यातील कन्हान पोलिसांनी जुनी कामठीतील गाडेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्याच्या बाबासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोलकत्यातील पोलिसांनी दाखल केलेले हे प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बावा ताजी चनवीरुद्दीन, त्याची पत्नी, ताजी स्तफाफीरुद्दीन फैज, तेजस ब्रागडे, बशरा फातेमा ताजी, मल्ला के व अन्य, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. काही जणांनी तिचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर महिलेचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तिला डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी कशीबशी स्वतःची सुटका करून घेत ती महिला रेल्वेने ती कोलकात्याला गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT