पुणे

तळेगावात कचरागाड्यांचे सातत्याने काम

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा गाड्या तळेगाव परिसरात सतत पाऊस चालु असताना सुध्दा नेहमी प्रमाणे सातत्याने रोज येत आहेत. कचरा गाडीवरील नगरपरिषदेचे कामगार भर पावसात नागरिकांकडून ओला कचरा, सुका कचरा घेणेस कसलीही टाळाटाळ करीत नसून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. यामुळे तळेगाव शहराचे स्वच्छतेस भर पावसातही दुर्लक्ष होत नाही ही समाधानाची बाब आहे.

सतत आणि भर पावसात कचरा गाड्या घराजवळ येत असताना सुध्दा अनेक नागरिक कचरा इतरत्र,मोकळ्या जागेत, आडबाजुला,रस्त्याच्या कडेला टाकून परिसर अस्वच्छ करतात. काहीजण कचरा टाकताना कोणी पाहू नये यासाठी रात्री-अपरात्री कचरा टाकतात. डीपी रोड,कातवीरोड,आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला पोत्यात आणून भरपूर कचरा टाकण्यात येत असलेचे दिसून येते.

यामुळे परिसर अस्वच्छ तर होतोच यामुळे तेथे भटकी कुत्री आदी जनावरे वावरतात तसेच पावसाने कचरा भिजतो हे रोगराईला आमंत्रण आहे.अशा कचरा टाकणा-यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT