सावधान...टोलनाक्याचे बांधकाम ठरतंय वाहनचालकांचा काळ! Pudhari
पुणे

Accident News: सावधान...टोलनाक्याचे बांधकाम ठरतंय वाहनचालकांचा काळ!

पारगाव येथील टोलनाक्यावरील प्रकार, अनेकांना झाली दुखापत

पुढारी वृत्तसेवा

नानगाव: पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील मोसे बुद्रुक येथे शिरूर-चौफुला मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या टोलनाक्याच्या बांधकामावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक वाहनचालक व नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. परंतु, उपाययोजना न केल्याने येथील अपघात थांबलेले नाहीत.

गेली काही महिन्यांपासून न्हावरे ते चौफुला या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. याच कामात सध्या पारगाव सा. मा. येथील मोसे येथे नव्याने टोलनाका सुरू होणार आहे. टोलनाक्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला धडक बसून अनेक वाहनांना अपघात झाला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी संबंधित विभागाने सुरक्षा म्हणून लाल दिवे लावले होते. तसेच टोलसाठी बांधण्यात आलेल्या या छोट्या मार्गावरून होणारी वाहतूक बाजूने वळविण्यात आली होती.

सध्या या ठिकाणी पुन्हा कामाला सुरुवात केल्याने या ठिकाणी सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेले ब्लॉक बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याची छोटीमोठी कामे सुरू आहेत. दिवसा वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येतो मात्र रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच अनेकांना गंभीर दुखापती देखील झाल्या आहेत.

संबंधित विभागाने होणार्‍या अपघातांच्या या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करून या ठिकाणचे काम लवकरात लवकर पूर्ण करून अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींकडे लक्ष देऊन लवकर कामे पूर्ण करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT