गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन Pudhari
पुणे

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या सेसची वाढ व घरगुती गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या सेसची वाढ व घरगुती गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू, त्याचप्रमाणे अनेक लोकोपयोगी आश्वासने दिली होती.

निवडणूक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने फोल ठरली असून, केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये वाढ करून गोरगरीब नागरिकांची हेळसांड करीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 500 रिपयांत घरगुती गॅससिलिंडर देणार, असे घोषित केले असताना सत्तेत आल्यावर त्यांनी आता पाठ फिरवली आहे. ही सामान्य जनतेची फसवणूक व चेष्टा असल्याची टीका त्यांनी केली.

या वेळी अ‍ॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, रफिक शेख, लता राजगुरू, अजित दरेकर, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अविनाश साळवे, नीता रजपूत, अक्षय जैन यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT