बाणेर-पाषाण जोड रस्त्याच्या पाहणीप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व अधिकारी Pudhari
पुणे

बाणेर-पाषाण लिंकरोडचे काम पूर्ण करा: चंद्रकांत पाटील

पुढारी वृत्तसेवा

बाणेर : ‘महापालिकेने बाणेर-पाषाण येथील 36 मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करावा,’ असे आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

कामांची केली पाहणी

सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रोड, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट, बालेवाडीतील हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी कामांची पाटील यांना पाहणी करून आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक दोनचे उपआयुक्त गणेश सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.

काम लांबल्याने नागरिकांची गैरसोय

आयवरी इस्टेट-सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी पदपथ, पथदिवे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामाची भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. बाणेर येथील 36 मीटर लिंकरोडचे काम लांबल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

महापालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन लिंकरोडचे काम लवकर सुरू करावे. रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने पूर्ण करावी, तसेच निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या वेळी पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

बालेवाडी येथील हाय स्ट्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. महापालिका आयुक्तांनी जागामालकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या दूर कराव्यात आणि भूसंपादन करून रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT