पुणे

पिंपरी : शहरातील गुन्हेगारांचे ‘कोम्बिंग’ ; गुन्हे शाखेने 13 आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात कोम्बिंग आणि नाकाबंदी करून गुन्हेगारांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. गुन्हे शाखेने तेरा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून तब्बल तीन लाख 34 हजार 299 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुंडाविरोधी पथकाची कारवाई

गुंडाविरोधी पथकाने चिखली ते मोईकडे जाणार्‍या रस्त्यावर लूटमार करणार्‍या सिध्दार्थ कल्याण सोनवणे (18, रा. तिरंगा सोसायटी, अजंठानगर, चिंचवड), दयानंद बालाजी घाडगे (18, रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्यासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 31 हजार 300 रुपयांचे दोन लोखंडी सुरे, दोन महागडे लॅपटॉप, एक चार्जर, एक माऊस, दोन मोबाईल, एक बॅग, मनी पर्स, वेगवेगळया बँकेचे क्रेडीट व डेबीट कार्ड असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, आरोपी अली तैयब सैयद ( 19, रा. शंकर पांढारकर चाळ, आकुर्डी) याला अटक करून त्याच्याकडून एक तलवार जप्त केली आहे. अंकित अनिल भारसनळी (19, रा. पंचतारानगर, आकुर्डी) याच्याकडून एक रॅम्बो तलवार शिवम सुनिल दुबे (20, रा. नारायण पांढारकर चाळ, आकुर्डी) याच्याकडून एक लोखंडी कोयता आणि साईनाथ विष्णु बुरसे (20, रा. भारतमातानगर, जरेकर पार्क, दिघी) याच्याकडून एक जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शुभम ऊर्फ चिम्या शिवदास पवार (20, रा. ओटा स्किम, निगडी ) आणि दिपक मारुती राजगुरु (25, रा. समर्थ सोसायटी, ओटा स्किम, निगडी) यांना अटक करून सहा घरफोड्यातील एक लाख 2 हजार 999 चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, भारती विदयापिठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी सुरेश ऊर्फ सुरज हरीव्दार गुप्ता (31, रा. सदगुरुनगर, भोसरी) याला अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

युनिट चारच्या पथकाने अक्षय दशरथ शिंदे (22, रा. जगताप पेट्रोलपंपा शेजारी, धोत्रे चाळ, वैदवस्ती, पिंपळे गुरव, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. तसेच, दिपक शशीकांत पवार (23, रा. ओटास्कीम निगडी) याच्याकडूनही एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कामगिरी

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोजकुमार लोहिया, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक एच. व्ही. माने यांनी कामगिरी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT