पुणे

पुणे : सांगवी येथे नारळाच्या झाडांवर वीज कोसळली

अमृता चौगुले

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील काळेवस्ती येथे नारळाच्या झाडांवर वीज कोसळली.
सांगवी येथील माजी उपसरपंच अर्जुन काळे व शंकर काळे यांच्या वस्ती शेजारच्या शेतातील नारळाच्या झाडांवर बुधवारी (दि. 15) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वीज कोसळली. वीज पडल्याने अर्जुन काळे यांच्या पाच नारळाच्या झाडांचे व शंकर काळे यांच्या पाच नारळाच्या झाडांचे व एका आंब्याच्या झाडाचे नुकसान झाले आहे. काळेवस्ती येथे मोठी लोकसंख्या आहे. सुदैवाने वस्तीपासून अंदाजे 200 मीटर अंतरावर ही वीज कोसळली.

या प्रकारामुळे नारळांच्या व आंब्याच्या झाडांशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे विद्यमान उपसरपंच अनिल काळे सांगितले. सांगवी व परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी दाटी करण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावणेसात वाजता मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट होऊन काळेवस्ती येथे वीज कोसळली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू व हरभरा पिकांना धोक्याची घंटा वाजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

SCROLL FOR NEXT