पुणे: राज्यात रविवार (दि. 30) पासून ढगाळ वातावरण तयार झाले असून मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्मा जास्त जाणवला. रविवारी चंद्रपूरचा पारा राज्यात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअसवर गेला होता.
गत 24 तासांपासून राज्यावर ढगांचे सावट आहे. मात्र, वार्यांचा वेग कमी असल्याने पाऊस पडण्यात अडथळा येत आहे. असे वातावरण सोमवार, दि. 31 मार्चपर्यंत राहणार आहे. तसेच मंगळवार (दि. 1) आणि बुधवारी (दि. 2) बहुतांश भागांत गारपीट होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मात्र, ही स्थिती देखील वार्यांच्या वेगावर अवलंबून आहे. रविवारी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात 0.5 ते 1 अंशापर्यंत घट दिसून आली. मात्र, उष्मा कायम होता.