पुणे

पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी अनुभवला शून्य सावली दिवस

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये शनिवारी (दि. 13) दुपारी 12.31 मिनिटांनी नागरिकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. स्वत:ची सावली बरोबर पायाजवळ पडल्याने या भौगोलिक घटनेला कॅमेराबंद करण्यात आले. नागरिकांना उद्यादेखील हा अनुभव घेता येणार आहे. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. त्यानंतर दक्षिणायन म्हणजे सूर्याचा दक्षिण दिशेकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान सूर्य अक्षांशांवरून पुढे जात असतो.

पुढे जात असताना सूर्य ज्या अक्षांशावर असेल त्या गावात दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि एका क्षणी आपली सावली आपल्याला दिसत नाही. त्या दिवसाला शून्य सावली दिवस किंवा झिरो शॅडो डे म्हणतात. पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी दुपारी 12.31 मिनिटांनी सावली दिसेनाशी झाली. राज्यात 3 मे पासून 31 मे पर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक असणार आहे. शहरात दुपारी साडेबारा वाजता नागरिकांची सावली पायाजवळ पडली होती

SCROLL FOR NEXT