पुणे

पुणे : नादुरुस्त चेंबरमुळे नागरिक त्रस्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील विविध रस्त्यांवरील ड्रेनेज आणि पावसाळी चेंबरची झाकणे तुटली आहेत. चेंबरच्या जाळ्यांची चोरी आणि निकृष्ट सिमेंट झाकणांमुळे पादचार्‍यांसह वाहनचालकांचाही अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चेंबरच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेकडून शहरात लहान-मोठ्या रस्त्यांवर ड्रेनेज आणि पावसाळी लाइन टाकण्यात आल्या आहेत. या लाइनवर रस्त्याच्या मध्यभागी किंवा रस्त्याच्या साइडला चेंबर आहेत. अनेक चेंबरवरील जाळ्या तुटलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी चेंबर खचले आहेत, तर काही ठिकाणी चेंबर रस्त्याच्या वर आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत.

चेंबरच्या जाळींमध्ये प्लास्टिकचे कागद आणि कचरा साचल्याने चेंबर तुंबून रस्त्यावर पाणी साचते. शहरातील अनेक रस्त्यांवर चेंबरच्या जाळ्या तुटलेल्या आहेत. या तुटलेल्या चेंबरमध्ये अनेकदा नागरिक झाडांच्या फांद्या, विटा आणि दगड ठेवून इतरांना अपघातापासून वाचण्यासाठी सूचित केले जाते. चेंबरच्या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या बसविल्या जात असल्याने त्या वारंवार तुटत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. तर, चेंबरच्या लोखंडी जाळ्यांची अनेकदा चोरी होते. काही भागांत रस्त्याच्या कडेला असणारे खाद्यपदार्थ आदी स्टॉलधारक कचरा टाकण्यासाठी पर्याय म्हणून जाळ्या तोडून त्यात कचरा टाकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळ्या नसल्यामुळे अपघात होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT