भोसरी : रुपीनगर येथे अनेक दिवसांपासून चेंबर तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे परिसरातून ये-जा करताना नागरिक दुर्गंधीचा नाहक सामना करावा लागत आहे. दुर्गंधी पाण्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते. याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रुपीनगर येथील भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी येथील तुंबलेल्या चेंबरमधून परिसरातील रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असल्याचे माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
फेरफटका मारायला येणार्या ज्येष्ठ नागरिक तसेच खेळण्यासाठी येणार्या लहान मुलांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंध आणि घाण यामुळे परिसरात उग्र वास येत आहे. त्यामुळे या समस्यांचा परिसरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती बिकट आणखी होत चालली असल्याचे नागरिक सांगतात. स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशसानाकडे याची तक्रार करुनदेखील कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. वारंवार तुंबत असलेल्या चेंबरची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.