पुणे

एकलहरेजवळील सर्कल बनले ‘मौत का कुआँ’

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात एकलहरे येथून शिंदेवाडीकडे जाणार्‍या नागरिकांसाठी भुयारी मार्ग नसल्याने तेथे छोटे सर्कल बनवले आहे. मात्र, त्यामुळे अपघात वाढल्याने ते 'मौत का कुआँ' बनले आहे. एकलहरे येथून शिंदेवाडीकडे जाणार्‍या चौकात वेडीवाकडी वळणे कृत्रिमरीत्या बनवली आहे. पुण्याहून नाशिककडे जाणारी वाहने व चौकामध्येच दुसर्‍या बाजूकडे जाणारी स्थानिक वाहनांना नवीन राष्ट्रीय महामार्ग लक्षात न आल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गाने जाणे सोयीस्कर ठरत आहे.

परंतु त्याचवेळी कळंब व एकलहरे गावातील सुलतानपूर, फकिरवाडी व आसपासच्या 10 ते 15 वाड्यावस्त्यांवरील नागरिक आपली वाहने, उजव्या बाजूने चालवतात. रस्त्यावर गॅस पंपाकडे जाणारे, शाहमदार देवस्थानकडे जाणारे भाविक, साई द्वारका पेट्रोल, भारत पेट्रोलियमकडे व त्या बाजूकडील आस्थापनांकडे वाहने रहदारी करत असतात.

अशावेळी समोरून काही वाहने विरुद्ध येण्याची शक्यता वाढलेली आहे. गेल्या काही दिवसांत या ठिकाणी काही अपघात होऊन काहींना प्राण गमवावे लागले तर काही जखमी झाले आहेत. एकलहरेच्या चौकात दोन्ही बाजूने सेवा रस्ता करून डांबरीकरण करण्याची मागणी एकलहरे ग्रामस्थ व ग्रामपंचायत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्याकडे वारंवार करत असल्याचे शिंदेवाडीचे ग्रामस्थ मिलिंद शिंदे आणि माजी सरपंच संतोष डोके यांनी सांगितले.

ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत
शिंदेवाडीचे शेतकरी वाहतूक, शाळेय मुलांची वाहतूक करणारी वाहने व पालक, गवळी, शेतमालाच्या गाड्या, गोरक्षक व शेजारील हॉटेल ग्राहकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पांजरपोळकडे व शाहमदार देवस्थानकडे जाणारा सेवा रस्ता न बनवल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने उलट्या दिशेने खडबडीत हमरस्त्याला चिटकून चालवावी लागत आहेत, अशी माहिती एकलहरेचे माजी उपसरपंच नवनाथ शिंदे आणि अ‍ॅर्ड. शशांक डोके यांनी दिली. याबाबत संबंधित विभागाने कारवाई न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT