पुणे

चिकूची 100 ते 120 रुपये किलोने विक्री

अमृता चौगुले

पुणे : चिकूचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात पुणे विभागाच्या विविध भागांतून चिकूची आवक सुरू झाली आहे. रविवारी (दि. 27) बाजारात सहाशे ते सातशे गोण्यांमधून चिकू बाजारात दाखल झाला. त्याच्या दहा किलोस 100 ते 500 रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात त्याची 100 ते 120 रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. हंगामाच्या सुरुवातीला चिकूची आवक व मागणी चांगली असून, दरही समाधानकारक मिळत असल्याचे सांगण्यात आले.

मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पहिल्या बहरातील सीताफळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक होत असली तरी त्यामध्ये दर्जेदार फळांचे प्रमाण कमी आहे. याखेरीज पोषक वातावरणामुळे बाजारात गावरानसह अन्य पेरूची आवक वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने पेरूच्या भावात वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने पपईचे भाव किलोमागे पाच रुपये, तर खरबुजाचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वधारले आहेत.

बाजारात बहुतांश फळांची आवक जावक कायम असून, दर स्थिर आहेत. रविवारी (दि. 27) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, मोसंबी 60 ते 70 टन, संत्री 1 ते 2 टन, डाळिंब 70 ते 80 टन, पपई 12 ते 15 टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, पेरू 1 हजार क्रेट, चिकू 600 ते 700 गोणी, सफरचंद 50 ते 60 टन, सीताफळाची 40 ते 50 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 150-350, मोसंबी : (3 डझन): 100-200, (4 डझन) : 30-100, संत्रा : (10 किलो) : 300-800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 40-150, गणेश : 10-30, आरक्ता 10-60, कलिंगड : 10-15, खरबूज : 10-50, पपई : 15-35, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 250-400, चिकू (दहा किलो) : 100-500, सीताफळ 10-120, सफरचंद : सिमला (15 ते 16 किलो) 3000-4500, रॉयल गाला (13 ते 14 किलो) 2000 ते 2600.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT