कार्ला : शिवजयंतीच्या दिवशी शिवज्योत घेऊन येत असताना शिलाटणे येथील शिवभक्तांचा रावेत-ताथवडे येथे अपघात झाला होता. त्यात दोन शिवभक्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या दोन्हीही शिवभक्तांच्या कुटुंबियांची खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट घेत धीर दिला. शिलाटणे येथील अपघातात शिवभक्त करण कोंडभर व आर्यन कोंडभर या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, 33 जण जखमी झाले होते. यामधील एक शिवभक्त दवाखान्यात उपचार घेत आहे.
करण कोंडभर यांंचा आज दशक्रिया विधी होता. हा विधी झाल्यावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी दोन्हीही शिवभक्तांच्या कुटुंबातील सदस्यांची घरी भेट घेत आधार दिला. तसेच, भविष्यात महाराष्ट्रात कोणत्याही शिवभक्तासोबत असे होऊ नये यासाठी शिवजयंतीसाठी शासकीय नियमावली तयार करू, असा विश्वास या वेळी त्यांनी दिला.