पुणे

छत्रपती संभाजी महाराज अवमान प्रकरण ; मोरया गोसावी मंदिराला नोटीस

अमृता चौगुले

पुणे : चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरातील फलकावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूरप्रकरणी मंदिर प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. संभाजी बि—गेडने अ‍ॅड. अतुल पाटील यांच्यामार्फत ही नोटीस पाठविली आहे.

मंदिर आवारातील फलक पूर्ण काढून खरा इतिहास सांगणारा फलक लावण्याची मागणी नोटिशीमार्फत करण्यात आली आहे. तसेच, चुकीची माहिती दिल्याबद्दल शिवप्रेमींची माफी मागावी, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आत माहिती देण्यात यावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीत म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT