पुणे

मित्र-मैत्रिणींना रुबाब दाखविण्यासाठी ‘खाकी’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चतुःशृंगी पोलिसांनी एका तोतया पोलिसाला पकडले आहे. मित्र-मैत्रिणींना रुबाब दाखविण्यासाठी खाकी गणवेश घालून तो शहरात फिरत होता. पायात चप्पल घातलेल्या या तरुणाकडे पोलिसांचे लक्ष गेले अन् त्याचे बिंग फुटले. चौकशीत त्याने आपण औंध पोलिस चौकीत नेमणुकाला असल्याचे सांगितले. यशवंत रमेश धुरी (वय 30, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी मूळ कुडाळ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार औंधमधील नागरस रोडवरील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक व त्यांचे सहकारी

तोतया पोलिसाला पोलिसांकडून बेड्या

डिलिव्हरी बॉय म्हणून करीत होता काम. त्याला पोलिस व्हायचे होते. मात्र, होता आले नाही. त्यासाठी त्याने जुन्या बाजारातून पोलिस वर्दी विकत घेऊन अंगावर परिधान केली. याप्रकरणी पोलिस कापरे तपास करीत आहेत. हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी राम नदीच्या पुलावर एक पोलिस उभा असल्याचे त्यांना दिसले. तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता, त्याने औंध चौकीला पोलिस असल्याचे सांगितले.

आपल्याच हद्दीतील चौकीत नेमणुकीला असलेला आपल्याला माहिती नाही. त्याचा गणवेश जरी पोलिसांचा असला तरी पायात चप्पल होती. खाकी ड्रेसच्या खांद्यावर म़ पो़, कॅपवर पिंपरी-चिंचवड पोलिस असे लिहिलेले होते. ते पाहिल्यावर तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात आणले.

SCROLL FOR NEXT