पुणे

पुणे स्टेशन येथून 16 लाखांचे चरस जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात दोघांकडून 16 लाख 32 हजार रुपयांचे एक किलो 88 ग्रॅम चरस, दोन मोबाइल फोन, दुचाकी असा 18 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अमीर मसिउल्लाय (24, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तर प्रदेश), अतुल गौरव वानखडे (वय 22, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. तथागतनगर, खामगाव, जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली. खान आणि वानखडे पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता परिसरात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चरस जप्त करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT