पुणे

पुणे : शिवजयंतीनिमित्त आज वाहतुकीत बदल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 10) शहरातील मध्यवर्ती भागासह लष्कर, खडकी भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. जयंती असल्याने शहरातील विविध संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अनेक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

असे आहेत वाहतुकीतील बदल :
मुख्य मिरवणूक भवानीमाता मंदिर येथून सुरू होऊन भवानी पेठमार्गे रामोशी गेट चौक, नेहरू रोडने हमजेखान चौकापासून पुढे सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून जिजामाता चौकमार्गे लालमहल चौक येथे विसर्जन होणार आहे. त्यामुळे नेहरू रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊसकडून सेव्हन लव्हजकडे जाणा-यांनी क्वार्टर गेट चौकातून इच्छितस्थळी जावे.

लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणा-यांनी नेहरू रोड पॉवर हाऊस चौक येथून जिजामाता चौकमार्गे पुढे जावे. तर, देवजी बाबा चौकाकडून मिठगंज चौकमार्गे स्वारगेटकडे जाणा-यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पुलापासून पॉवर हाऊस चौकातून नेहरू रोडचा वापर करावा. गणेश रोडवरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजी रोडमार्गे गाडगीळ पुतळा- बुधवार चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

मिरवणूक मोती चौक, फडके हौद चौक पास होईपर्यंत केळकर रोडने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरमार्गे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार अप्पा बळवंत चौकातून वळवून बाजीराव रोड, शिवाजी रोडमार्गे इच्छितस्थळी जाता येईल. शिवाजीरोडवरून स्वारगेटला जाणार्‍या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. तर, स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणार्‍या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने इच्छितस्थळी जावे. मिरवणूक पुढे जाईल तसतशी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. खडकी बाजार येथील शिवाजी पुतळा येथून सुरू झालेली मिरवणूक कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक, तालीम चौकापासून पुढे महाराष्ट्र बँकमार्गे शिवाजीपुतळा येथे विसर्जित होणार आहे. या वेळी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT