चंद्रकांत पाटील.  File Photo
पुणे

Chandrakant Patil : प्रत्येकवेळी 'नाचता येईना अंगण वाकडे' : 'मतचोरी' आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

मतचोरीवरुन विरोधकांचे आरोप केवळ बुडबुडे, याचा काहीही उपयोग होत नाही

पुढारी वृत्तसेवा

Chdrakant patil on Maharashtra Municipal Election Voting

पुणे : प्रत्येक वेळी 'नाचता येईना अंगण वाकडे' या उक्तीप्रमाणे आताही 'मतचोरी' वगैरेचे आरोप होतील. पण या लोकांना हे कळतच नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नी आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने केले आहे, ज्यामुळे लोकांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे असे आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, अशा शब्‍दांमध्‍ये विरोधकांकडून मतमोजणीवेळी 'पाडू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट), मतदानावेळी मार्कर शाई वापराबाबत विरोधकांनी घेतलेल्‍या आक्षेपावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्‍यक्‍त केले.

विरोधकांचे आरोप केवळ बुडबुडे

माध्‍यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्‍हणाले की, २०१४ मध्‍ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. याचवर्षी देवेंद्र फडणवीस हेही मुख्‍यमंत्री झाले. . त्यानंतरच्या पाच वर्षांत आता विकासावर आणि चेहऱ्यावर चर्चा होऊ लागली आहे. त्‍यामुळे आता विरोधी पक्षांकडून मतचोरीवरुन सुरु असणारे आरोप केवळ बुडबुडे ठरत आहेत, त्याचा काहीही उपयोग होत नाही.

आजीबाई म्‍हणाल्‍या, कमळ चिन्ह बदलून 'मोदीजी' असेच करा....

परवा प्रचारादरम्यान ग्रामीण भागात मला एक आजीबाई भेटल्या. त्या म्हणाल्या, 'एक काम कराल का? मोदीजींना सांगा की तुमचे कमळ हे चिन्ह बदलून 'मोदीजी' असेच करा, म्हणजे आम्हाला ते (मतदान करायला) सोपे पडेल.' मोदीजींचा इतका मोठा करिश्मा आहे, जो बिहारमध्येही दिसला, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. प्रत्येक वेळी 'नाचता येईना अंगण वाकडे' या उक्तीप्रमाणे आताही 'मतचोरी' वगैरेचे आरोप होतील. पण या लोकांना हे कळतच नाही की, मोदीजींनी आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने केले आहे, ज्यामुळे लोकांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण झाला आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्राच्‍या आवारात येणार्‍यांचे मतदान होणार

प्रभाग २४ मधील मतदारसंघात तीन ते चार मशिन बंद पडल्यामुळे वेळ वाया गेला, अशी तक्रार आली आहे. साधारणतः असा नियम आहे की, साडेपाच वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारात उपस्थित असतील, त्या सर्वांना टोकन देऊन रात्री १२-१ वाजेपर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT