चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिस निलंबित Chandrakant Patil News
पुणे

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिस निलंबित

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथे श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आले असताना त्यांच्या अंगावर शनिवारी अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली. सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमधील ११ पोलिसांना निलंबित केले आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण (Chandrakant Patil News : )

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

औरंगाबाद पैठण संतपीठच्या कार्यक्रमात ते बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी "भारतात शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करण्यासाठी शासकीय अनुदान मिळाले नाही. यासाठी त्यांनी भीक मागितली" असे विधान केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियातून आणि विरोधी पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरणही दिले.

निषेध व्यक्त करत शाईफेक

पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील हे पदाधिकाऱ्यांच्या घरातून चहा घेऊन परत येत होते. तेवढ्यात तिघांनी त्यांच्या अंगावर शाईफेक केली. त्यानंतर ते 'चंद्रकांत पाटील मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी देत होते. या तिघांनाही चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं. त्यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ पोलिस निलंबीत तर एका पत्रकाराला अटक

चंद्रकांत पाटील यांच्यावर तिघांनी शाईफेक केली याप्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. या 11 मध्ये मध्ये आठ पोलीस कर्माचरी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही तिघांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. त्यानंतर 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे तर एका पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे. कारण तो शाईफेक ज्या लोकांनी केली त्यांच्यासोबत हा पत्रकार होता. जाणीवपूर्वक शाई फेकीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी विनंती केली की पोलिसांची यामध्ये चूक नाही तरीही या ११ पोलिसांना निलंबीत करण्यात आलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT