अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, वाटाणा व टोमॅटोची मोठी आवक झाली. हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांच्या भावात घसरण झाली. कांद्याची मोठी आवक झाल्याने भावात घसरण झाली. पालेभाज्यांची आवक वाढून भावात घसरण झाली. एकूण उलाढाल 6 कोटी 10 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 9 हजार 500 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 1 हजार 500 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमालभाव 1,400 रुपयांवरून 1,300 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,100 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 300 क्विंटलने घटल्याने भावात शंभर रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमालभाव 1,200 रुपयांवरून 1,300 रुपयांवर पोहचला. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 12 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 340 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 5 हजार रुपयांपासून 6,500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:
कांदा - एकूण आवक - 9,500 क्विंटल. भाव क्रमांक - 1 - 1,300 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,100 रुपये, भाव क्रमांक 3 - 800. बटाटा - एकूण आवक - 1,100 क्विंटल. भाव क्रमांक 1 - 1,300 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 3 - 700 रुपये.
फळभाज्या: फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे:
टोमॅटो - 294 क्विंटल (1,000 ते 1,500), कोबी - 232 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर - 205 क्विंटल (800 ते 1,400), वांगी - 92 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी - 84 क्विंटल (2,500 ते 4,000), दोडका - 57 क्विंटल (2,500 ते 3,500), कारली - 67 क्विंटल ( 2,000 ते 3,000), दुधीभोपळा - 62 क्विंटल (1,000 ते 1,600), काकडी - 93 ( क्विंटल (1,000 ते 1,600), फरशी - 20 क्विंटल (3,000 ते 4,000), वालवड - 42 क्विंटल (3,000 ते 4,000), ढोबळी मिरची - 149 क्विंटल (3,000 ते 4,000), चवळी - 42 क्विंटल (1,500 ते 2,500), वाटाणा - 70 क्विंटल (4,500 ते 5,500), शेवगा - 35 क्विंटल (2,500 ते 3,500), गाजर-57 क्विंटल (1,000 ते 2,000), गवार - 48 क्विंटल (5,000 ते 7,000 ), आले - 155 क्विंटल (3,000 ते 4,000).
पालेभाज्या: पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे: मेथी - एकूण 13 हजार 970 जुड्या (500 ते 800 रुपये), कोथिंबीर - एकूण 26 हजार 150 जुड्या (400 ते 700 रुपये), शेपू - एकूण 2 हजार 554 जुड्या (600 ते 800 रुपये), पालक - एकूण 2 हजार 838 जुड्या (400 ते 600 रुपये).
जनावरे: जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गायींपैकी 25 गायींची विक्री झाली (15,000 ते 70,000 रुपये), 55 बैलांपैकी 45 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), 80 म्हशींपैकी 55 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 8,100 शेळ्या-मेंढ्यापैकी 7,600 शेळ्यांची विक्री झाली.