यवत पुढारी वृत्तसेवा : यवत रेल्वे स्टेशनजवळील निलकंठेश्वर मंदिराशेजारील शेतातील घरात बुधवारी रात्री १०:४५ वाजता चड्डी-बनियन गँगने हल्ला केला. घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत घरातील लोकांनी मारहाण केली. दगड व काठ्यांनी झालेल्या बेदम मारहाणीत पाचपैकी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
उर्वरित तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले असून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.