Central Railway Reel Stunts Pudhari
पुणे

Central Railway Reel Stunts: धावत्या ट्रेनमध्ये आणि रुळांवर रील्स, फोटोशूट बनवणे पडेल महागात; रेल्वेकडून कारवाईचा इशारा

अशा धोकादायक कृती फक्त कायद्याने गंभीर फौजदारी गुन्हा नसून, यामुळे प्राणघातक अपघात घडू शकतात, असे स्पष्ट करत मध्य रेल्वेने प्रवाशांना यापासून परावृत्त राहण्याचे आवाहन केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी धावत्या गाड्यांमध्ये, फूटबोर्डवर, छतावर किंवा रेल्वे रुळांवर जीवघेणे स्टंट करून रील्स बनवणाऱ्यांना आता मध्य रेल्वेने कठोर इशारा दिला आहे.

अशा धोकादायक कृती फक्त कायद्याने गंभीर फौजदारी गुन्हा नसून, यामुळे प्राणघातक अपघात घडू शकतात, असे स्पष्ट करत मध्य रेल्वेने प्रवाशांना यापासून परावृत्त राहण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर रेल्वे कायद्याच्या कलम १५४, १४५ आणि १५६ अन्वये कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले जाईल. तसेच, भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम ३५(३) अन्वये संबंधित आरोपीला नोटीस बजावून थेट रेल्वे न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले जातील. न्यायालयात खटला चालवून दोषींना मोठा दंड ठोठावण्यात येईल आणि अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

छतावर किंवा फूटबोर्डवर स्टंट करताना उच्च दाब विजेच्या तारांचा धक्का लागणे, चालत्या गाडीतून खाली पडणे किंवा ट्रेनची धडक बसणे यांसारख्या गंभीर दुर्घटना घडतात. अशा व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर इतर तरुणांनाही याचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन मिळते, त्यामुळे अधिक लोकांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा प्रकारे रील्स, व्हिडीओ बनवू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

१३८ वर करा तक्रार अशा प्रकारची कोणतीही धोकादायक घटना किंवा स्टंटबाजी निदर्शनास आल्यास प्रवाशांनी तत्काळ आरपीएफच्या १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा स्टेशनवर कार्यरत अधिकारी, अथवा जीआरपी कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. सुरक्षित प्रवास करा आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रवास करा.
- हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT