सीबीएससीकडून छत्रपतींच्या इतिहासाचा अपमान
शासनाने त्वरित बदल करा
अन्यथा सीबीएससी पॅटर्नच्या पुस्तकांची होळी
शिक्षणमंत्र्याच्या घरासमोर तीव्र आंदोलन
अखिल भारतीय मराठा महासंघाकडून इशारा
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससीच्या) शाळांमध्ये इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर फक्त एक धडा म्हणजे केवळ ६८ शब्दांचा समावेश केलेला आहे. हा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करताना विचार करा आणि त्यात बदल करा, अन्यथा शिक्षणमंत्र्याच्या घरासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अनिल ताडगे आणि मराठा क्रांती मोर्चाचे सचिन आडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
'दै पुढारी' ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी ही पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेला महासंघाच्या रेखा कोंडे, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर, आबा जगताप, जयश्री साळुंखे, सविता म्हस्के, उज्वला ताडगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ताडगे म्हणाले, सीबीएससी च्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व त्यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याबद्दल केवळ ६८ शब्दांमध्ये इतिहास सांगून सीबीएससी बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महाराष्ट्राचा देखील अपमान केलेला आहे. सीबीएससी बोर्ड हे देश पातळीवर शिकवल्या जाणाऱ्या इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये फक्त ६८ शब्द छापले असतील तर हे नक्कीच निषेधार्य आहे. याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्र्याची भेट घेऊन निवेदन देणार आहोत यामध्ये बदल केला गेला नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
सीबीएससी पॅटर्नच्या पुस्तकांची होळी करू... छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील महाराणी ताराराणी असतील व थोरले शाहू महाराज असतील या सर्वांचा इतिहास ६८ शब्दांमध्ये बसवून मराठ्यांचा अपमान या ठिकाणी दिल्लीत बसलेल्या सीबीएससी बोर्ड करत आहे. मुळात बाजीराव पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते मराठ्यांचे राजे नव्हते त्यामुळे सीबीएससी बोर्डाने केलेल्या चुका तातडीने दुरुस्त कराव्यात व याची दखल राज्य सरकारने घेऊन सीबीएससी पेंटर्न राज्यात लागू करताना विचार करावा. या सर्व गोष्टींची दखल घेतली नाही तर सीबीएससी पॅटर्नच्या या पुस्तकांची आम्ही होळी करू.सचिन आडेकर (समनव्यक, मराठा क्रांती मोर्चा)
कुंजीर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याच्या सीमा या थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये सध्या असलेल्या पाकिस्तानातील कटक पर्यंत व बंगाल पासून खाली कन्याकुमारीपर्यत पसरलेल्या होत्या. मुळात सीबीएससी बोर्डच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख व्हायला पाहिजे