पुणे ड्रग प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री; आतापर्यंत 16 जण अटकेत Pudhari
पुणे

Pune News: पुणे ड्रग प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री; आतापर्यंत 16 जण अटकेत

कुरिअरद्वारे लंडनला गेलेल्या अमली पदार्थचा पत्ता सीबीआयच्या हाती

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

Pune Crime News: दिल्ली येथून संदीप यादव याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने कुरीअरद्वारे लंडनला तब्बल 218 किलो ड्रग्स पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ज्या ठिकाणी हे ड्रग पाठविण्यात आले त्या लँडनस्थित ठिकाणाचा पत्ता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.

त्यामुळे पुणे (Pune) येथील कुरकुंभ ड्रग प्रकरणात तब्बल 3 हजार 674 कोटींचे ड्रग पकडल्यानंतर आता या गुन्ह्याची व्याप्ती पुणे, मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटकासह विदेशात पोहचल्यानंतर केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासात एन्ट्री घेतली आहे.

त्यामुळे सीबीआय लंडनच्या त्या पत्यावर जाऊन तपास करणार असल्याचेच यामुळे स्पष्ट झाले आहे. पुणे पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ( एनसीबी) पाठोपाठ आता सीबीआय कडूनही या देशभर आणि देशाबाहेर विस्तारलेल्या ड्रग च्या जाळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

निशांत मोदीला निघाली होती लूक आउट नोटीस

दरम्यान या प्रकरणात नुकताच पकडण्यात आलेल्या निशांत मोदीच्या चौकशीत देवेद्र यादव आणि संदीप यादव यांच्या सोबतचे लाखो रूपयांचे व्यवहार आढळून आले होते. त्यात पैसे हस्तांतरीत केले असल्याचे आढळून आले हाते.

या दरम्यान निशांत मोदीला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, तो एनसीबी समोर हजर झाला नाही. त्याने हजर राहण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस (एलओसी) बजावण्यात आली होती.

त्यानुसार त्याला 17 सप्टेंबर रोजी सीएएसएमआय विमानतळावरून पळून जाताना ताब्यात घेयात आले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने संदीप यादव आणि दवेंद्र यादव यांना दिलेल्या बेकायदेशिर निधीची कबुली दिली होती.

एनसीबी कडून नव्याने गुन्हा दाखल

पुणे पोलिसांकडे असलेला तपास जून महिन्यात एनसीबीने काढून केतल्यानंतर नुकताच एनसीबीने याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनसीबीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ मागितली होती. त्यांना न्यायालयाच्या आदेशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

तर मॅफेड्ऱॉनच्या वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गाडीतून तब्बल 236 किलो वजनाचे अंमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. ही गाडी पोलिसांनी नुकतीच मूळ मालकाला परत केली आहे.

गाडीत कोणताही फेरबदल करता येणार नाही, या खटल्याचा निकाल होईपर्यंत गाडीची विक्री करता येणार नाही व तपास कामात गरज लागेल तेव्हा पोलिस ठाण्यात गाडी हजर करावी, अशा अटी- शर्तींवर गाडी मूळ मालकाला परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसारच पोलिसांनी ही गाडी परत केली आहे, अशी माहितीही पोलिस सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT