जात पडताळणी आता होणार सुलभ; बार्टीचा टीसीएससोबत करार Pudhari
पुणे

Digital Caste Verification: जात पडताळणी आता होणार सुलभ; राज्य सरकारचा TCS सोबत महत्त्वाचा करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्याचा हा एक भाग असून, याकरिता नुकताच एक शासन निर्णय काढण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची एकाच सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया व्हावी व या प्रक्रियेमध्ये सुलभीकरण व्हावे, तसेच नागरिकांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळावित, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत एक करार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्याचा हा एक भाग असून, याकरिता नुकताच एक शासन निर्णय काढण्यात आला होता. याकरिता तत्कालीन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पाठपुरावा केला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी व विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा आस्वार यांनी सदरची प्रणाली तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता पाठपुरावा केला होता. (Latest Pune News)

शासन निर्णयानुसार सर्व तरतुदी करारामध्ये समाविष्ट करून घेतल्या. ही प्रणाली लवकरात लवकर कार्यप्रवण होण्याकरिता नुकताच हा सामंजस्य करार करण्यात आला. या नव्याने विकसित होणाऱ्या प्रणालीमुळे पासपोर्टच्या धर्तीवर वैधता प्रमाणपत्र जारी करण्याकरिता प्राप्त अर्जानुसार प्रथम अर्जदारास प्रथम प्राधान्य या सुविधेमुळे कागदपत्र पडताळणीकरिता संबंधित समिती भेटेची वेळ प्राप्त होणार आहे.

यामुळे नागरिकांना रांगेमध्ये थांबण्याचा त्रास कमी होणार आहे. महसूल विभागाच्या जाती प्रमाणपत्र डेटाबेससोबत एकत्रीकरण केल्यामुळे जात प्रमाणपत्र तपासणी त्वरित होण्यास मदत मिळणार आहे, त्यासोबतच एपीआयच्या मदतीने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण होणार आहे.

अनुसूचित जाती, ओबीसी, आर्थिक दुर्बल घटक, इमाव या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) माहिती व तंत्रज्ञान विभागाने टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस) या संस्थेसोबत मुंबई येथे बार्टीचे महासंचालक सुनील वारे, टाटा कंपनीचे तेज पाल भाटला, वरिष्ठ उपाध्यक्ष यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी बार्टीचे अधिकारी अनिल कारंडे, डॉ. बबन जोगदंड, सुमेध थोरात, पूजा वायदंडे तसेच टीसीएस कंपनीचे चांद रैना मिलिंद कांबळे, सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT