मंचर : शेतीसंदर्भातील केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार केल्याप्रकरणी सात जणांवर पारगाव पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ विठोबा कजबे, रोहिणी पंढरीनाथ कजबे, वैभव पंढरीनाथ कजबे (सर्व रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) व इतर चार अनोळखी लोकांनी सदरचा प्रकार मंगळवारी (दि.22) संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास वैदवाडी फाटा येथे केला.
फिर्यादी जयश्री कजबे व त्यांचा दीर पंढरीनाथ कजबे यांच्यात शेतीसंदर्भात केस सुरू असून, त्याचा निकाल पंढरीनाथ कजबे यांच्या बाजूने लागावा व फिर्यादी जयश्री कजबे यांचे नुकसान व्हावे, या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचे जयश्री कजबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
हेही वाचा :